पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत आश्वासने पूर्ण करू : राहुल

0
5

कर्नाटकात आमचे सरकार आले तर प्रचारात दिलेली आश्वासने पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करू, अशी ग्वाही काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी कोलारमधील सभेत बोलताना दिली. कर्नाटकात गृहज्योती योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट वीज मोफत मिळेल. गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत 2000 रुपये दरमहा महिलांना दिले जातील. दारिद्र्‌‍यरेषेखालील कुटुंबांना अन्नभाग्य योजनेअंतर्गत 10 किलो तांदुळ आणि युवा निधी योजनेअंतर्गत प्रत्येक पदवीधरास 2 वर्षांपर्यंत 3000 रुपये दिले जातील, तर डिप्लोमाधारकास 1500 रुपये दिले जातील, असे राहुल गांधी म्हणाले. ही सर्व आश्वासने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण केली पाहिजे असे मी कर्नाटकातील काँग्रेसच्या नेत्यांना सांगू इच्छितो, असे राहुल गांधी म्हणाले.