पर्वरीतील गोळीबार प्रकरणगुन्हा अन्वेषणकडे ः मुख्यमंत्री

0
14

पर्वरीतील निओ मॅजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावरील गोळीबार प्रकरणाचा तपास गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत काल दिली.

विधानसभेत आमदार विजय सरदेसाई यांनी कॅसिनो व्यावसायिकावरील गोळीबार प्रकरणावर आवाज उठविला.
श्रीनिवास नायक यांच्यावरील गोळीबाराचे प्रकरण सोमवारी गुन्हा विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींना लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.

या प्रकरणाला तीन दिवस पूर्ण झाले असून पोलिसांना संशयित व्यक्तींचा शोध घेण्यास अजूनपर्यंत यश प्राप्त झालेले नाही. या प्रकरणी दोघांविरोधात पर्वरी पोलीस स्थानकावर तक्रार दाखल केली आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक मुंबई व इतर ठिकाणी रवाना झालेली आहेत. या प्रकरणी प्रत्यक्ष दोन व्यक्तींचा सहभाग असल्याचे दिसत असले तरी यात आणखी संशयितांचा समावेश असण्याची शक्यता आहे.