पर्येतील उमेदवार दोन दिवसांत ठरणार

0
4

>> निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांची माहिती

कॉंग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे. ते निवडणूक लढविणार नसतील, तर त्यांच्याकडे पर्यायी उमेदवार देण्याची विनंती करण्यात आली आहे. येत्या एक-दोन दिवसांत पर्येतील उमेदवाराबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
तृणमूलने लुईझिन फालेरो, आलेक्स रेजिनाल्ड व इतर नेते पळविले. कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना याची कल्पना असल्याने तृणमूलसोबत आघाडीसाठी चर्चा केली नाही, असे चिदंबरम यांनी सांगितले.

गोव्यातील आमदारांच्या पक्षांतराच्या घटना लक्षात घेऊन कॉंग्रेसच्या उमेदवारांना विविध देवतांसमोर पक्षनिष्ठेची व पक्षांतर न करण्याची शपथ देण्यात आली आहे, असे चिदंबरम यांनी स्पष्ट केले.

उमेदवारांशी चर्चेअंती मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरणार
कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडणुकीपूर्वी जाहीर करावा की निवडणूक निकालानंतर उमेदवाराची निवड करावी, यावर बैठकीत चर्चा केली जाणार आहे. त्यासंबंधी कॉंग्रेसकडून योग्य निर्णय घेतला जाणार आहे, असेही चिदंबरम यांनी सांगितले.