गुंतवणूक धोरणात तरतुद
पुढील पाच वर्षांच्या काळात गोवा सरकारने पर्यटन व्यवसायातून महसूल वाढविण्यासाठी व रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या हेतूने अतिरिक्त ८ हजार खाटांची सोय करण्यासाठी तारांकीत हॉटेलना परवाने देण्याची तयारी ठेवली आहे.
उच्च दर्जाचे पर्यटक गोव्यात आले पाहिजे यासाठी पायाभूत सुविधा तयार करतील. गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांची सुधारणा करण्याचीही सरकारची तयारी आहे.
गोव्यात सध्या वैद्यकीय पर्यटनात वाढ होत आहे. राज्यातील इस्पितळांमध्ये सध्या ५३३६ खाटांची व्यवस्था आहे. या क्षेत्रात नवीन सुविधा तयार करण्याच्या प्रयत्नात सरकार असल्याचे गुंतवणूक धोरणात स्पष्ट केले आहे.
सरकार लवकरच आरोग्य विषयक सुविधांची तपशिलवार माहिती देणारे वेब पोर्टल सुरू करणार असल्याचे धोरणात म्हटले आहे.