Home बातम्या पर्यटकांच्या गर्दीत नववर्षाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत

पर्यटकांच्या गर्दीत नववर्षाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत

0

किनार्‍यांवर गजबज, हॉटेल्स फूल, सर्वत्र पार्ट्यांची धूम

नववर्षाच्या स्वागतासाठी अभिनेते, उद्योजक, राजकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महनीय व्यक्तिबरोबरच देश विदेशातील पर्यटकांची राज्यात गर्दी वाढली असून काल रात्री महाराष्ट्र- कर्नाटक या शेजारच्या राज्यातून अनेक वाहने गोव्यात दाखल झाली आहेत.

राज्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी खचून भरले असून खोल्याही मिळणे कठीण झाल्याने पर्यटकांनी समुद्र किनारे व पदपथांचाही वापर केला. अनेक ठिकणी दारूकामाची आतषबाजी करून रात्री बारा वाजता नववर्षाचे स्वागत केले.

वाहतुकीची कोंडी

किनारी भागात संध्याकाळपासूनच वाहतुकीची कोंडी सुरू झाली होती. पोलीस खात्याने जास्तीतजास्त पोलिसांना कळंगुट, वागातूर, हणजुण, मिरामार कोलवा, बाणावली, पाळोळे या किनार्‍यांवर बंदोबस्तासाठी तैनात केले होते. 

पार्ट्या व मेजवान्या

रात्री किनारी भागातील अनेक हॉटेलनी पार्ट्या व मेजवान्या आयोजित केल्या होत्या. शहरातील मद्याच्या दुकानातही प्रचंड गर्दी दिसत होती. रेस्टारन्टमध्येही पर्यटकांना जागा मिळत नव्हती. पर्यटकांबरोबरच राज्यातील लोकही नववर्ष साजरे करण्यासाठी वेगवेगळ्या किनार्‍यावर जमले होते. त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले.
रिव्हर क्रुज, तसेच कॅसिनो जहाजांवरही पर्यटकांनी गर्दी केली. बंगळूर, दिल्ली, मुंबई या भागातील अनेक श्रीमंत पर्यटक नववर्षाच्या पूर्वसंध्येवर कॅसिनो खेळण्यासाठी आले होते. राज्यातील हॉटेल मालकांनीही खोल्याचे भाडे वाढविल्याने पर्यटक व हॉटेल कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक झडत होत्या. 
राज्यातील वेगवेगळ्या चर्चमध्ये प्रार्थनाही झाल्या.