पर्पल महोत्सवाचे जे. पी. नड्डांना आमंत्रण

0
12

दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी राज्य दिव्यांग व्यक्ती आयोगाचे सचिव ताहा हाझिक यांच्यासमवेत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सव 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी औपचारिक आमंत्रण दिले. श्री. फळदेसाई यांनी श्री. नड्डा यांना पर्पल महोत्सवाच्या मागील दोन वर्षांच्या आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाची माहिती दिली. श्री. फळदेसाई यांनी या महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आणि दिव्यांग व्यक्तीच्या सशक्तीकरणासाठी मदत झाल्याचे सांगितले. गोवा सरकारने दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सशक्तीकरणासाठी केलेल्या कार्याने प्रभावित होऊन कार्याचे कौतुक केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवामध्ये सहभागी होण्यास उत्सुकता दर्शविली. दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणकारी कार्यास केंद्र सरकारचे संपूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली.