दोनापावल येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या आवारात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्टेनोग्राफर आणि ज्युनिअर सचिवालय साहाय्यक (जेएसए) परीक्षेच्या वेळी डमी उमेदवार म्हणून परीक्षा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना काल पणजी पोलिसांनी अटक केली. परीक्षेच्या दरम्यान तोतयेगिरी प्रकरणात सुनील कुमार (26, प्रयागराज) आणि प्रशांत कुमार या दोघांना अटक आली आहे. दोन्ही संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशासन नियंत्रक राकेश शुक्ला यांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपी सुनील कुमार याला प्रत्यक्ष नोंदणीकृत उमेदवार म्हणून तोतयेगिरी केल्याबद्दल रंगेहाथ पकडण्यात आले आहे. प्रशांत कुमार (उत्तर प्रदेश) हा परीक्षा केंद्राबाहेर होता असे तक्रारीत म्हटले आहे.

