30 C
Panjim
Tuesday, June 22, 2021

परीक्षांचं करायचं काय?

  • दिलीप वसंत बेतकेकर

खरं तर शिकणं म्हणजे काय तर जाणून घेणं; व जाणून घेण्याची क्रिया ही जन्मापासून मृत्यूपर्यंत सुरू असते. आपण सध्या शिकवण्यावर अधिक भर दिल्यामुळे मुलांच्या जाणून घेण्याच्या प्रक्रियेत खरं तर अडथळाच निर्माण करतो. सध्याचं संकट ही संधी मानून शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी व पालकांनीही या मानसिकतेतून बाहेर पडायला हवं. परीक्षा कृतिशील करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न हवेत. ‘घोका आणि ओका’ यातून बाहेर पडायला हवे.

कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि बरेच जण ‘आनंदाचे डोही’ मनसोक्त डुंबायला लागले. काहीजणांना खूप वाईटही वाटले. उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. आपद्धर्म म्हणून हा निर्णय घ्यावा लागला. आज आनंद वाटत असला तरी त्याचे परिणाम फार चांगले होतील असे नाही. एक वर्ष ठीक आहे; पण पुढच्या वर्षी नेमकी काय स्थिती असेल हे सांगता येत नाही.
या आपत्तीमुळे अनेक बाबींचा पुनर्विचार करावा लागला आहे. केवळ शिक्षणाच्या बाबतीत म्हणायचे तर अध्ययन अध्यापनात नवनवीन प्रयोग झाले आहेत. सर्व जीवन पुनश्‍च सुरक्षित झाल्यावर हे प्रयोग टाकून न देता त्यांचा आणखी अधिक उपयोग शिक्षणात करता येईल हे बघायला हवे. शिक्षणपद्धतीला ते सर्व प्रयोग उपयुक्तच ठरणार आहेत. या सर्व प्रयत्न आणि प्रयोगांमुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन मंडळ अधिक अनुभवसंपन्न झाले आहे, असे गृहित धरायला हरकत नाही.

आज जरी परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी यानिमित्ताने परीक्षांचा एकूणच नव्याने विचार करणे योग्य ठरेल. अनेक देशांत परीक्षांमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न चालला आहे. आपल्या देशातही परीक्षेसंबंधी अवास्तव ताण, चिंता आणि भीती दूर करण्यासाठी काही प्रयोग चालले आहेत. पण ते प्रयोग खूपच मोजके आहेत. बेटांसारखे आहेत.
‘परीक्षा’ या शब्दासंबंधी प्रचंड ताण व भीती आहे. गैरसमजही खूप आहेत. त्या गैरसमजांमुळेच ताण व भीती अधिक वाटते. काही झाले तरी परीक्षा ही ‘आवश्यक बाब’ सध्यातरी नाकारता येत नाही.

‘कोणतीही परीक्षापद्धती पूर्णतः दोषमुक्त अथवा आदर्श नसते; परंतु परीक्षांना पर्याय नाही,’ असे सॉक्रेटिसने अडीच हजार वर्षांपूर्वी म्हटले होते. पर्याय नसला तरी त्यातील अधिकाधिक दोष दूर करता येतील का? त्यातील चिंता, ताण, भीती हलक्या करता येतील का? आणि मुख्य म्हणजे त्या अधिक अर्थपूर्ण, उपयुक्त करता येतील का? परीक्षा टाकून देता आल्या नाहीत तर निदान त्या कल्पकतेने, विविध पद्धतीनी घेता येतील का? आणि जमलंच तर आनंददायी होतील का?
हे अशक्य नाही. प्रयत्नसाध्य आहे.

‘परीक्षा’ या शब्दामुळेच भीती निर्माण होते. किमान प्राथमिक स्तरावर ‘परीक्षा’ हा शब्द टाळून अन्य काही शब्दप्रयोग करता येतील असे पाहायला हवे. चाचणी, मूल्यमापन असे शब्दही वापरले जातात. पण प्राथमिक स्तरावर याहीपेक्षा सोपा, गमतीशीर, आनंददायी शब्द शोधायला हवा.

‘मुलांनो, आज आपण काही पुस्तकांतून काही शोधणार आहोत,’ असं म्हणत स्तरानुसार काठीण्य पातळी वाढवत शब्द शोधायला लावणे. नावं (व्यक्ती, गाव, वस्तू) शोधायला लावणे.
आकलन, ग्रहणशक्ती, विचारक्षमता, व्यावहारिक संदर्भ यांबाबतीत विद्यार्थी कुठे आणि कसा आहे हे बघणे महत्त्वाचे. यासाठी विविध प्रकारची साधनं (टूल्स) वापरून पाहता येतील. आज विद्यार्थी हा परीक्षार्थी आणि शिक्षक परीक्षक अशी ठोकळेबाज पद्धती आहे. पण विद्यार्थ्याला स्वतःचे मूल्यमापन करण्याची संधी दिली पाहिजे. स्वतःचं मूल्यमापन करण्याची पद्धती शिकवायला हवी. उदा. एखाद्या पाठातील मला काय समजलं? कोणता भाग कठीण वाटला? कोणता भाग नवीन वाटला? कोणता भाग अतिशय आवडला? असे प्रश्‍न स्वतःच स्वतःला विचारायची सवय व पद्धत विकसित केली तर विद्यार्थी अधिक जबाबदार बनेल. सध्या तो वर्गात बसून ‘पॅसिव्हली’ शिक्षक जे काय सांगतात, बोलतात, दाखवतात तेवढंच बघत किंवा ऐकत असतो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याची सक्रियता जवळजवळ शून्य.

स्वतःच स्वतःचं मूल्यमापन करणे, यासाठी ‘जोहारी विंडो’ नावाची एक पद्धत आहे. त्यात मुलांनी काय करायचं?
१. मला व इतरांना माहीत आहेत अशा गोष्टी.
२. मला माहीत आहेत, पण इतरांना माहीत नाहीत अशा गोष्टी.
३. मला माहीत नाहीत, पण इतरांना माहीत आहेत अशा गोष्टी.
४. मला व इतरांनाही माहीत नाहीत अशा गोष्टी.
खरं तर शिकणं म्हणजे काय तर जाणून घेणं, व जाणून घेण्याची क्रिया ही जन्मापासून मृत्यूपर्यंत सुरू असते. आपण सध्या शिकवण्यावर अधिक भर दिल्यामुळे मुलांच्या जाणून घेण्याच्या प्रक्रियेत खरं तर अडथळाच निर्माण करतो. शिकवणे हा एक प्रकारचा अडथळाच आहे. यातून शिक्षकांनी स्वतःला व विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची नितांत गरज आहे. मुलं त्यामुळे परावलंबी बनतात. त्यांना शिकण्याची प्रेरणाच मिळत नाही.
सध्याचं संकट ही संधी मानून शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी व पालकांनीही या मानसिकतेतून बाहेर पडायला हवं. परीक्षा कृतिशील करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न हवेत. ‘घोका आणि ओका’ यातून बाहेर पडायला हवे.
एक वडाचं व एक पिंपळाचं पान घ्या. दोन्ही पानांचं नीट निरीक्षण करून नोंदी करा. दोन्ही पानांत साम्य काय आहे? फरक काय आहेत याच्या तपशीलवार नोंदी करण्यासाठी काही मुद्दे, बिंदू देता येतील. हा एक छोटा प्रकारच झाला. असे छोटे-छोटे प्रकल्प देऊन मूल्यमापन करता येईल.
‘ओपन बूक’ परीक्षा पद्धत ही सध्याच्या काळात सर्वात अधिक उपयुक्त व व्यावहारिक वाटते. ओपन बूक परीक्षा दिसायला सोपी वाटते, पण ती वाटते तितकी सोपी व सरळ नाही. या प्रकारच्या परीक्षेने विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचीही कसोटी असते. धड्याखाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरे धड्यात शोधून पेपरमध्ये लिहिणे सोपे आहे. पण ‘ओपन बूक परीक्षेत’ प्रश्‍न निर्माण करणे हे शिक्षकांसमोरचे आव्हान, तर पुस्तक उघडे ठेवूनही उत्तरे लिहिणे हे वाटते तितके सोपे नाही. परीक्षेतील अनेक गैरप्रकारांना त्यामुळे आळा बसेल.

दोन दिवसांपूर्वीच एका शाळेच्या बैठकीमध्ये भाग घेतला. नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परीक्षा घेतल्या गेल्या. विद्यार्थ्यांनी घरी बसून वह्या-पुस्तकं घेऊनच उत्तरं लिहिली असतील. तरीही ३३ पैकी फक्त १५ विद्यार्थी पास व अठरा विद्यार्थी नापास झाले अशी माहिती मुख्याध्यापकांनी दिली. हे उदाहरण धक्कादायक होतं. सर्वांनीच विचार करायची वेळ आहे. अनेक पालक-विद्यार्थ्यांनी शाळा (सरकार) देत असलेली पुस्तकंही नेली नाहीत अशीही माहिती मुख्याध्यापकांनी दिली.
शाळा व शिक्षकांकडून खूप अपेक्षा व्यक्त केल्या जातात. पण सध्या मुलं घरीच असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांची जबाबदारी ही अधिक आहे. कोणावर तरी दोषारोपण करणे सोपे आहे; पण आजच्या अपवादात्मक व भयावह स्थितीत दोष देण्यापेक्षा सर्वजण मिळून काय करू शकतो याचा विचार करणेच हितावह.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

विरोधक एकत्र येणार?

‘जो मै बोलता हूँ, वो मै करता हूँ, जो मै नही बोलता वो तो डेफिनेटली करता हूँ’ हा हिंदी चित्रपटातील संवाद ज्यांना...

कोरोना बळी ३ हजाराच्या उंबरठ्यावर

>> राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्याही ३ हजारांवर; नवे केवळ २१७ रुग्ण; ७ जणांचा बळी राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३...

१० हजार पदे भरणारच : मुख्यमंत्री

>> विरोधकांकडून होणार्‍या टीकेनंतर घोषणेचा पुनरुच्चार विविध सरकारी खात्यांमध्ये रिक्त असलेली १० हजार पदे येत्या सहा महिन्यांत भरणे अशक्य...

कोविडविरुद्धच्या लढ्यात योग ठरला फायदेशीर

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : आग्वाद किल्ल्यावर योगदिन साजरा योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य अशी भेट असून,...

भाजपचा तूर्त स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय

>> प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची माहिती राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीतील आघाडीबाबत एवढ्या लवकर निर्णय घेतला जाऊ शकत नाही....

ALSO IN THIS SECTION

हिमालयाच्या सर्वोच्च शिखराचे मापन कुणी केले?

दत्ता भि. नाईक ‘हिमालयन माऊंटेनियरिंग इन्स्टिट्यूट’ ही साधीसुधी संस्था नाही. तिच्याच अध्यक्षांनी हा विषय काढल्यामुळे तो आता चर्चेचा...

ख्याल गायकीचे अनभिषिक्त सम्राट पं. राजन मिश्रा

गो. रा. ढवळीकर बुलंद आवाजाने व भावपूर्ण गायकीने जगभर मैफिली गाजवणारे पं. राजन मिश्रा एवढ्या लवकर जातील असे वाटले...

कर्जदार मृत्यू पावल्यास वसुलीचे काय?

शशांक मो. गुळगुळे सध्या कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बर्‍याच चालत्या-बोलत्या व्यक्ती अचानक जाण्याचे अनुभव येत आहेत. अशा...

सख्य

गिरिजा मुरगोडी फ्रेण्डशीप-डे हा सर्व सर्व स्तरांवरचा मैत्री दिवस, तर हा खास सख्य उजागर करणारा मैत्र दिन. संकल्पना...

सन २०२० सालातील वाचकप्रिय पुस्तके

कालिदास बा. मराठे ‘ललित’ मासिक गेली चौपन्न वर्षे दर वर्षाच्या एप्रिल महिन्यात ‘चोखंदळ वाचक निवड’ प्रसिद्ध करत असते....