आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी येत्या अभ्यासक्रम वर्षात बी एससी परिचारिका जागा ५० वरून १०० पर्यंत वाढविण्याचा सरकारचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. त्यामुळे राज्यातील सरकारी किंवा खाजगी इस्पितळातील शिक्षित परिचारिकांची गरज भागविण्यास मदत होईल असे ते म्हणाले.
आरोग्य सेवा संचालनालयाने बांबोळी येथील परिचारिका शिक्षण संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या बीएससी परिचारिका (८ वी तुकडी) च्या वार्षिक दिनात पार्सेकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सदर कार्यक्रमास आमदार विष्णू सुर्या वाघ आणि परिचारिका शिक्षण संस्थेच्या श्रीमती रेमी लासेर्डा उपस्थित होत्या. पार्सेकर यांनी गरजू रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी डॉक्टर व परिचारिका समान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.

