‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने जगातील विविध देशांत पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ पाठवले आहे. हे सर्व खासदार लवकरच भारतात परतत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या खासदारांसोबत येत्या 9 किंवा 10 जून रोजी बैठक घेण्याची शक्यता आहे. शिष्टमंडळातील सहभागी खासदार परदेश दौऱ्यात आलेले अनुभव आणि तिथल्या बैठकांबाबत मोदींना माहिती देतील. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 7 शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर गेले आहेत. या शिष्टमंडळांनी जगातील अनेक देशांचा दौरा केला आणि ऑपरेशन सिंदूर, भारताची दहशतवादाविरोधात भूमिका आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला.

