पथदीपांवरील खर्चासाठी वीज दरात वाढ : वीजमंत्री

0
7

राज्यातील पथदीपांवर येणारा खर्च भरून काढण्यासाठी वीज खात्याने वीज दराज वाढ केल्याचे स्पष्टीकरण वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल दिले. या वीज दरवाढीतून मिळणारा महसूल हा पथदीपांच्या देखभालीवर खचृ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

घरगुती वापराच्या विजेवर प्रती युनिट फक्त ५ पैसे एवढी वाढ करण्यात आली आहे. उद्योगांसाठीच्या विजेवर, तसेच उच्च दाबाची वीज वापरकर्त्या ग्राहकांवर जास्त दरवाढीचा भार टाकण्यात आला असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. १ जूनपासून राज्य सरकारने नवे पथदीप धोरण तयार केलेले असून, या धोरणामुळेच ही दरवाढ करावी लागली आहे. या नव्या पथदीप धोरणानुसार आता पथदीपांची देखभाल व दुरुस्तीचे काम वीज खात्याला करावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.