पत्रादेवी नाक्यावर साधनसुविधा वाढविण्याची बैठकीत सूचना

0
118

 

पत्रादेवी येथील मुख्य वाहन तपासणी नाक्यावर वाहनांच्या तपासणीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधन सुविधा उभारण्याची सूचना राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत काल करण्यात आली.
मुख्य सचिव परिमल राय यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी अतिरिक्त काउंटरची सोय करून बांधकाम व इतर सामान घेऊन राज्यात येणार्‍या वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम सुरू करावे.

पत्रादेवी वाहन तपासणी नाक्यावर वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे बांधकाम व इतर सामान घेऊन राज्यात येणार्‍या वाहनांना बराच काळ ताटकळत राहावे लागत आहे.