पणजी महापालिका निवडणुकीसाठी आणखी 22 अर्ज दाखल

0
9

11 मार्च रोजी होणाऱ्या पणजी महापालिका निवडणुकीसाठी काल आणखी 22 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे आतापर्यंत पणजी महापालिका निवडणुकीसाठी दाखल केलेल्या एकूण अर्जांची संख्या 54 एवढी झाली. आज (दि. 24) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस आहे.
पणजी महापालिकेच्या सर्व 30 प्रभागांसाठी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलमधील सर्व 30 उमेवारांनी यापूर्वी अर्ज दाखल केलेले आहेत. महापौर रोहित मोन्सेरात यांच्याविरोधात प्रभाग 4 मधून जॉन पो यांनी अर्ज भरला आहे.
काल अर्ज दाखल केलेल्या 22 उमेदवारांमध्ये जॉन पो, शीतल नाईक, फुर्तादो लेनॉइड, विष्णू नाईक, याडल्ली राहुल, खान शबनम, नीळकंठ च्यारी, मदन शंभू फातर्पेकर, सूरज नाईक, प्रांजल नाईक, जॅक सुखिजा, आशिष नागवेकर, देवोदिना पेरेरा, गोविंद चोडणकर, महेश रेवणकर, भालचंद्र तारकर पेडणेकर, नितीन नार्वेकर, माधवी आमोणकर, वासुदेव मणेरीकर, घन:श्याम नास्नोडकर, वैभव साळगावकर यांचा समावेश होता.
काल दाखल करण्यात आलेल्या 22 अर्जांमुळे या निवडणुकीसाठी आतापर्यत दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची एकूण संख्या 54 एवढी झाली आहे.