पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी सुध्दा एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. पणजी महानगरपालिकेचे नूतन मंडळ निवडण्यासाठी 11 मार्च रोजी निवडणूक घेतली जाणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 17 फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. पणजी महानगरपालिका क्षेत्रात राजकीय हालचालींना गती आली आहे. सत्ताधारी भाजप पुरस्कृत गट, उत्पल पर्रीकरांचा आम्ही पणजीकर गट निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. दोन्ही गटांकडून अजूनपर्यंत प्रभागातील उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली नाही.

