पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरणाची सुनावणी येत्या २१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेरीन पॉल यांनी या खटल्यातील सर्व आरोपींना २१ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात व पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात हे दोघे या खटल्यातील मुख्य आरोपी आहेत. या खटल्यात दोषी ठरल्यास त्या दोघांनाही १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणी मोन्सेरात दाम्पत्य व अन्य ३५ जणांवर २०१४ साली सीबीआयने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.