आग लागली त्यावेळी तेथे तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम चालू होता. दुपारी भोंगा वाजल्यानंतर संबंधित कर्मचार्याने तो बंद केला व जेवणासाठी निघाला. त्यानंतर आतून धुराचे लोट सुरू झाले. अग्निशामक दलाच्या जवानांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तेथील चार कर्मचारी आत होते. त्यांना आग लागल्याची कल्पना आली. परंतु धुरामुळे कोठून बाहेर पडावे हे कळेनासे झाले. जवानांनी मदत केल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य झाले.
आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे पाच बंब मागविण्यात आले. प्रत्यक्ष आग कुठे लागली हे कळण्यास बराच उशिर झाला. धुरामुळे काहीही दिसेनासे झाल्याने जवानाना मदत कार्य करणे बरेच अडचणीचे झाले. दि. ६ वाजता प्रक्षेपित होणारे वार्तापत्रही स्थगित करावे लागले. संध्याकाळी उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम चालूच होते.
या आगीत स्टुडिओतील यंत्रसामुग्री जळून खाक झाली. त्याचप्रमाणे कागदपत्रे, फाईल्स व अन्य महत्त्वाच्या वस्तू भस्मसात झाल्या आहेत.

