मिनेझिस ब्रागांझा संस्थेने 30 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजल्यापासून मिनेझिस ब्रागांझा, संस्थेत हिंदी दिनानिमित्ताने हिंदी सृजनोत्सवाचे आयोजन केले आहे. गोव्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषेतील विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्यात मोनोॲक्टिंग, ऑन द स्पॉट कविता लेखन, निबंध लेखन, वक्तृत्व, रेखाटन आणि देशभक्तीपर गायन स्पर्धा यांचा समावेश आहे. या प्रसंगी गोवा विद्यापीठातून 2024-2025 मध्ये हिंदी भाषेत बी. ए. आणि एम. ए. मध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाईल. हिंदी साहित्य क्षेत्रातील मुंबईतील प्रसिद्ध साहित्यिक मधु कांकरिया या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. सन्माननीय अतिथी गोव्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठाच्या अध्यक्षा कृष्णी के. वाळके, मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब, समन्वयक डॉ. आशा गहलोत आणि मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे सदस्य सचिव अशोक परब उपस्थित असतील. अधिक माहितीसाठी 9421868322 वर संपर्क साधावा.

