पणजीत ३ तासांत ३ इंच पाऊस

0
8

राजधानी पणजी शहरात काल संध्याकाळी पडलेल्या जोरदार पावसामुळे स्मार्ट सिटी पणजीतील रस्ते पाण्याखाली गेल्याने एकच तारांबळ उडाली. तसेच पणजीमध्ये तीन तासात तब्बल ३.०९ इंच अशा विक्रमी पावसाची नोंद झाली, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

हवामान खात्याने राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार पणजी शहरात काल संध्याकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. प्रमुख बाजारपेठेतील सर्वच रस्ते पाण्याखाली गेले. गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. तथापि, अचानक पडलेल्या जोरदार पावसामुळे लोकांची एकच तारांबळ उडाली. पणजीत संध्याकाळी ५.३० ते रात्री ८.३० या तीन तासांत ३.०९ इंच पावसाची नोंद झाली.