पणजीत रवी नाईक यांच्या स्मरणार्थ उद्या शोकसभा

0
10

दिवंगत माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या रविवार 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता कला अकादमीच्या मुख्य सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान मंत्री रवी नाईक यांचे 14 ऑक्टोबरला मध्यरात्री निधन झाले. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या शोकसभेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शोकसभेला हजर राहण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध भागातील नागरिकांनी या शोक सभेमध्ये सहभागी होऊन दिवंगत माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.