आयटकच्या नेतृत्वाखाली काल कामगारांनी पणजीत जेल भरो आंदोलन केले. यावेळी सुमारे २०६ कामगारांनी अटक करवून घेतली. सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ हे जेल भरो आंदोलन आयोजित केले होते.
काल सकाळी ९.३० वा. पणजी बसस्थानकानजीकच्या क्रांति सर्कलकडे कामगार जमा झाले होते. यावेळी कामगार नेते आयटकचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका, सहसरचिटणीस आ. डी. मंगेशकर, अध्यक्ष प्रसन्न उटंगी, चिटणीस सुहास नाईक यांची भाषणे झाली.
कामगारांचे किमान मासिक वेतन १२ हजार रु. करणे, कंत्राटी कामगारांना सेवा संरक्षण बहाल करणे, कंत्राटी कामगारांना नियमित करणे, समान कामासाठी समान वेतन देणे, जुआरी ऍग्रोच्या ६०० कंत्राटी कामगारांना पुन्हा सेवेत घेणे, अशा कामगारांच्या मागण्या होत्या.