पणजीतील ४६ बेकायदा गाडे हटविणार

0
52

पणजी महापालिका क्षेत्रातील ४६ बेकायदेशीर गाडे हटविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिका आयुक्त संजीत रॉड्रिगीस यांनी दिली.

पणजी बाजार गाळे वाटप घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी आयएएस अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव सरकारला पाठविला आहे. दि. ३१ मार्चपर्यंत या घोटाळ्याची चौकशी पूर्ण केली जाईल, असे त्यांनी सांगितले.