Home बातम्या पणजीतील सरकारी कार्यालयांचे स्थलांतर करण्याचा विचार

पणजीतील सरकारी कार्यालयांचे स्थलांतर करण्याचा विचार

0

पणजीच्या मुख्य बाजारात असलेल्या या सरकारी कार्यालयांमुळे शहरातील वाहतुकीच्या व पार्किंग समस्येत भर पडत असल्याचे फुर्तादो यांचे म्हणणे असून सरकारने ही कार्यालये अन्यत्र हलवावीत अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

सरकारने ही कार्यालये हलवावीत अशी मागणी त्यानी पत्रकाराशी बोलताना केलेली असतानाच महापालिकेचे आयुक्त संजीत रॉड्रिग्ज यांनी मात्र सरकारी कार्यालये पणजी बाजारातून अन्यत्र हलवली जाऊ नयेत अशी भूमिका घेतली आहे. या सरकारी कार्यालयांमुळे रोज कित्येक लोक शहरात येतात व त्यामुळे व्यापाराला चालना मिळते. अप्रत्यक्षरीत्या त्याचा महापालिकेला फायदा होतो असे त्यांचे म्हणणे असून त्यामुळे सरकारी कार्यालये अन्यत्र हलवल्यास महापालिकेला महसुलाला मुकावे लागेल असे रॉड्रिग्ज यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, दोघेही आपापल्या भूमिकेशी ठाम असून आपलाच निर्णय योग्य असल्याचा दावा दोघे करीत असल्याने त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत.