पडझडीच्या 101 घटनांमध्येसुमारे 13 लाखांचे नुकसान

0
9

राज्यात चोवीस तासांत 2.12 इंच पावसाची नोंद झाली असून, झाडांच्या पडझडीच्या 101 घटनांची नोंद झाली. या पडझडीमुळे सुमारे 13 लाख 53 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाने व्यक्त केला आहे. दरम्यान, हवामान विभागाने 25 जूनसाठी जारी केलेला ऑरेंज अलर्ट मागे घेतला असून, 25 ते 30 जून या कालावधीसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात चोवीस तासांत काणकोण येथे सर्वाधिक 3.81 इंच पावसाची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत एकूण 13.01 इंच पावसाची नोंद झाली असून, पावसाची तूट 52 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.

राज्यातील विविध भागात जोरदार वारे आणि पावसामुळे झाडे पडून घरे, वीज खांब, वाहनांचे नुकसान झाले. चोवीस तासांत अग्निशामक दलाकडे झाडांच्या पडझडीच्या आणखी 101 घटनांची नोंद झाली. वाळपई भागात सर्वाधिक 20, कुडचडे विभागात 15, म्हापसा विभागात 11, पणजी आणि फोंडा विभागात प्रत्येकी 9 झाडांच्या पडझडीच्या घटना घडल्या. मागील 24 तासांत विविध ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली.