26 C
Panjim
Tuesday, October 27, 2020

पंधरा दिवसांत कोरोनाने ९७ मृत्यू

>> काल राज्यात ६ मृत्यू, ३३२ नवे रुग्ण

राज्यात चोवीस तासात नवे ३३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पंधरा दिवसांत नवे ६,३५२ कोरोनाबाधित तर ९७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह ७,०३६ रुग्ण बरे झाले आहेत. या पंधरा दिवसांत २३ हजार २३८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
राज्यातील कोविड चाचण्यांची संख्या कमी होत असल्याने नवीन कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. कोविड प्रयोगशाळेत दरदिवशी सरासरी दीड हजार स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ७७० एवढी झाली आहे. सध्याच्या रुग्णांची संख्या ४०८४ एवढी झाली आहे.

६ जणांचा मृत्यू
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह ६ रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोना रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या ५२५ एवढी झाली आहे. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये ३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मडगाव येथील ईएसआय इस्पितळ आणि दक्षिण गोव्यातील एका खासगी इस्पितळात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर, हॉस्पिसिओ इस्पितळात एका रुग्णाला मृतावस्थेत आणण्यात आले होते.

मडगाव येथील ६२ वर्षांचा पुरुष रुग्ण, ४५ वर्षांची अनोळखी व्यक्ती, करंजाळे येथील ७० वर्षांची महिला रुग्ण, उत्तर गोव्यातील ८० वर्षांची महिला रुग्ण, डिचोली येथील ७४ वर्षांचा पुरुष रुग्ण आणि सा जुझे दी आरियल येथील ६० वर्षांच्या महिलेचे निधन झाले.

४३० जण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह आणखी ४३० रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३५ हजार १६१ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.४१ टक्के एवढे आहे. कोरोना पॉझिटिव्ह सौम्य लक्षणे असलेल्या आणखी १७३ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. होम आयसोलेशनखालील रुग्णांची एकूण संख्या १९५३४ एवढी झाली आहे. इस्पितळात ४१ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.

पणजीत नवे १७ रुग्ण
पणजी परिसरात नवे १७ रुग्ण आढळून आले असून पणजीतील सध्याच्या रुग्णांची संख्या २१४ झाली आहे. पणजी शहर परिसर, सांतइनेज, आल्तिनो, बॉक द व्हॉक, मिरामार, टोक करंजाळे, दोनापावल आदी भागात नवे रुग्ण आढळले.

उत्तर गोव्यात पर्वरीत सर्वाधिक २९१ रुग्ण आहेत. चिंबल येथे २६३, म्हापसा येथे २३५ रुग्ण, पणजी येथे २१४, साखळी येथे १९९ रुग्ण, कांदोळी १८३ रुग्ण, शिवोली येथे १२९ रुग्ण, वाळपई ११९ रुग्ण, खोर्ली येथे १११ रुग्ण, पेडणे १०७ रुग्ण तर डिचोलीत १०२ रुग्ण आहेत.
दक्षिण गोव्यात मडगाव येथे सर्वाधिक २८७ रुग्ण आहेत. फोंडा येथे २४० रुग्ण, वास्को येथे २२२ रुग्ण, कुठ्ठाळी येथे १८२ रुग्ण, कुडचडे येथे १२० रुग्ण, काणकोण येथे ११० रुग्ण आहेत.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

ऑक्टोबरमध्ये राज्यात कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट

>> दैनंदिन सरासरी सप्टेंबरमधील १८० वरून ६० वर राज्यात ऑक्टोबर महिन्यात कोविड स्वॅब तपासणीचे प्रमाण कमी असून कोरोना रुग्णांच्या...

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची ७ नव्या प्रकल्पांस मान्यता

गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सात नव्या उद्योग प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. काल मंडळाच्या...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोना

उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनाही...

बायंगिणी प्रकल्पाला श्रीपाद यांचा आताच विरोध का?

>> कॉंग्रेसचा पत्रकार परिषदेत सवाल केंद्रीय मंंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी बायंगिणी येथील प्रस्तावित कचरा प्रक्रिया...

बायंगिणी प्रकल्पाला श्रीपाद यांचा आताच विरोध का?

>> कॉंग्रेसचा पत्रकार परिषदेत सवाल केंद्रीय मंंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी बायंगिणी येथील प्रस्तावित कचरा प्रक्रिया...

ALSO IN THIS SECTION