पंतप्रधान म्हणाले, मी पुन्हा येईन

0
7

>> स्वातंत्र्यदिन सोहळ्यात व्यक्त केला विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल स्वातंत्र्यदिनी देशाला लाल किल्ल्यावरुन संबोधित केले. बिगर काँग्रेसी पंतप्रधानांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असे एकमेव पंतप्रधान आहेत, ज्यांनी सलग दहावेळा लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या भाषणात दहा वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडला. तसेच पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्येही आपणच लाल किल्ल्यावरुन भाषण करू, असा विश्वासही व्यक्त केला.

2014 मध्ये आपण तुम्हाला परिवर्तन घडेल असे आश्वासन दिले होते. त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात आणि मला या सर्वोच्च पदावर बसवले. 2019 मध्ये तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवला आणि आशीर्वाद दिला. आता 2024 साठीही मला आशीर्वाद द्या. पुढच्या 15 ऑगस्टला मी पुन्हा तुमच्यासमोर येईन. मी जे कष्ट उपसतो आहे ते तुमच्यासाठीच आहेत. मी तुमचे दुःख सहन करू शकत नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढच्या वेळीही म्हणजेच 2024 मध्ये आपणच पंतप्रधान असू, असा विश्वास व्यक्त केला.