पंतप्रधान मोदींचा वाढदिवस उत्साहात

0
3

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 72 वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भाजप सेवा पंधरवडाअंतर्गत दिल्ली, कर्नाटक, राजस्थानसह देशभरात विविध कार्यक्रम झाले. दि. 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीपर्यंत विविध कार्यक्रमांचे यानिमित्त नियोजन करण्यात आले आहे. विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटद्वारे केले नव्या भारताचे शिल्पकार मोदीजी यांनी आपल्या देशाच्या प्राचीन वारशाच्या आधारे भव्य आणि आत्मनिर्भर भारताचा भक्कम पाया रचण्याचे काम केले आहे. ‘राष्ट्रहित प्रथम येते’. अशा अनोख्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली देशसेवा करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे म्हटले
आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त दीपक बिस्वाल या कलाकाराने कटक, ओडिशात धुराचा वापर करून त्यांचे पोर्ट्रेट बनवले आहे. वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर पीएम मोदींचे वाळूचे शिल्प बनवले.