पंतप्रधान-मुख्यमंत्री यांच्यात आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग

0
142

देशाला टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनच्या स्थितीतून बाहेर आणत असतानाच देशाची अर्थ व्यवस्था सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी विविध मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. देशात कोरोनाची आपत्ती कोसळल्यापासून अशा पध्दतीने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची पंतप्रधानांची ही पाचवी वेळ आहे. देशात दि. २५ मार्चपासून लॉकडाऊन आहे. त्यावरही यावेळी चर्चा होईल.
केंद्रातील सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत प्रामुख्याने अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर भर राहणार आहे. तसेच देशात कोरोना-१९च्या लाल विभागात असलेले प्रदेश नारंगी किंवा हरित विभागात आणण्याचे प्रयत्न करणे यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. आजच्या बैठकीत आणखी काही नियम शिथिल करण्यावर चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. गेल्या २७ एप्रिल रोजी पंतप्रधानांबरोबर झालेल्या अशा बैठकीनंतर केंद्राने देशभरातील लॉकडाऊनमध्ये १७ मेपर्यंत वाढ केली होती. मात्र ही वाढ करताना आर्थिक बाबतीत बरेच नियम शिथिल केले होते. दरम्यान काल रविवारी राज्यांच्या मुख्य सचिवांबरोबर केंद्रीय कॅबिनेट सचिव गौबा यांची महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.