Home बातम्या पंतप्रधानांच्या राजिनाम्याची मागणी फेटाळली

पंतप्रधानांच्या राजिनाम्याची मागणी फेटाळली

0

भाजपा सत्तेवर येणार नाही : कॉंग्रेस

कोळसा घोटाळा प्रकरणी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राजिनामा द्यावा ही भाजपची मागणी कॉंग्रेसने फेटाळून लावली आहे. भाजपची ही मागणी फेटाळताना कॉंग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील सपशेल पराभव व तेथील आधीच्या सरकारमधील मंत्र्यांवर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांकडे लक्ष वेधले आहे.

‘‘पंतप्रधानांनी राजीनामा देण्याचा प्रश्‍नच नाही. पंतप्रधानांच्या राजीनाम्यामुळे काय होणार आहे? त्यांच्या राजीनाम्यामळे भाजपाचा काय फायदा होईल? कारण शेवटी येत्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेवर येणार नाही’’, असे मतप्रदर्शन कॉंग्रेसच्या प्रवक्त्या रेणुका चौधरी यांनी केले.

नकारात्मक विचारसरणीशिवाय भाजपात आणखी काही राहिले आहे काय? भाजपा धोरणांविषयी काही बोलतच नाही ही खेदजनक बाब आहे’, असे चौधरी म्हणाल्या.