राजकीय, आर्थिक विषयांवर चर्चा
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काल राष्ट्रपती प्रतिभासिंग पाटील यांची भेट घेऊन देशातील आर्थिक आणि राजकीय प्रश्नांबाबत चर्चा केली. सुमारे ४० मिनिटांची ही भेट होती.
पेट्रोल दरवाढ, रुपयाचे घटते मूल्य, शेअर बाजारावरील परिणाम या पार्श्वभूमीवर देशात कठीण आर्थिक परिस्थिती निर्माण झाली असून त्याबाबत चर्चा झाल्याचे कळते. पंतप्रधान आजपासून तीन दिवसांच्या म्यानमार भेटीवर जात असून त्याबाबतही त्यांनी राष्ट्रपतींशी सल्लामसलत केल्याचे कळते. नुकत्याच संपलेल्या अर्थसंकपल्पीय अधिवेशनाबाबतची उभयतांत चर्चा झाल्याचे राष्ट्रपती भवनाकडून सांगण्यात आले.