पंतप्रधानांचा भाजपवर हल्लाबोल

0
50

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काल लोकसभेत आक्रमक रूप धारण करीत भाजपला खडसावून काढले. भाजप सातत्याने यूपीए सरकारच्या उपलब्धींना कमी लेखण्याचा प्रयत्न करीत असला तर २००४ व २००९ प्रमाणे २०१४मध्येही भाजपचा पराभव निश्‍चित असल्याचे सिंग म्हणाले.

भाजपकडून कॉंग्रेस नेतृत्वाविरुद्ध निवडून निवडून अपमानजनक भाषा वापरली जात असल्याचे सांगत आपण मात्र त्या भाषेत उत्तर देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेचा समारोप करताना ते बोलत होते. २००९ साली लोहपुरूष एका मेंढरासमोर उभा केला होता मात्र त्याचा पराभव झाला, अशी उपरोधित टिका त्यांनी अडवाणींना उद्देशून केली.

दरम्यान, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करतानाच ती सावरणार असल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. येत्या दोन वर्षांत विकासदर पुन्हा ७-८ टक्क्यांवर येणार असल्याचे ते म्हणाले. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार सर्वोच्च प्राधान्य देण्यास कटीबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.