पंजाबमध्ये भाजपचे ऑपरेशन लोटस : आपचा गंभीर आरोप

0
9

पंजाबमधील आप सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन लोटस चालवले जात असल्याचा आरोप पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी केला आहे. भाजप आपच्या प्रत्येक आमदाराला प्रत्येकी २५ कोटी रुपयांची ऑफर देत आहे, असे हरपाल सिंग चीमा यांनी म्हटले आहे.

याबाबत आप पंजाबने ट्वीट केले आहे की, सिरियल किलर भाजपने आता पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस आणले आहे. पंजाबमधील आपच्या आमदारांना २५-२५ कोटींची ऑफर दिली जात आहे; पण भाजप हे विसरत आहे की, आम आदमी पक्षाचा एकही आमदार विकला जाणार नाही. दिल्लीप्रमाणे पंजाबमध्येही भाजपची ऑपरेशन अपयशी ठरेल.