पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला

0
9

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेड येथील गुरुद्वारा परिसरात प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना काल घडली. तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे कुटुंबासह दर्शन घेऊन बाहेर पडत असताना एका हल्लेखोराने त्यांच्यावर कृपाणने वार केला. या हल्ल्यात बादल यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून, त्यांना तातडीने नांदेड येथील यशोसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी आरोपी जसपालसिंह (62) याला तात्काळ घटनास्थळावरून ताब्यात घेतले.