पंचायत पोटनिवडणुकीत तीन रिक्त जागी मतदान

0
5

राज्यातील तीन वेगवेगळ्या पंचायतींच्या तीन वेगवेगळ्या रिक्त प्रभागांसाठी काल रविवारी पोटनिवडणुका झाल्या. त्यापैकी सांतइस्तेव्ह पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये 71.31 टक्के एवढे मतदान झाले. तर पार्से पंचायतीच्या 5 क्रमांकाच्या प्रभागासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत 85.16 टक्के एवढे मतदान झाले तर धर्मापूर-शिर्ली या पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 2 साली झालेल्या पोटनिवडणुकीत 60.91 टक्के एवढे मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाने दिली.