आपल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल गोवा पंचायत कर्मचारी संघटनेने पणजीत मार्चच्या पहिल्या आठवड्यात ४८ तासांचे धरणे कार्यक्रम आयोजिण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेची सर्वसाधारण बैठक काल संघटनाध्यक्ष दामोदर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येऊन हा निर्णय झाला असल्याचे कळविण्यात आले आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत पंचायतींसाठी असलेले अनुदान तातडीने देणे, निवृत्त कर्मचार्यांचे पेन्शन, पंचायत कर्मचार्यांची सतावणूक थांबवणे आदी मागण्यांचा समावेश प्रलंबित मागण्यांमध्ये आहे. कालच्या बैठकीस कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, विनोद कुंभारजुवेकर, संतोष नाईक, नंदा वाघुर्मेकर, रॉक डिसिल्वा, आनंद तलशीदार आदी उपस्थित होते.

