पंचायतींकडील निधी विनावापर : मुख्यमंत्री

0
8

राज्यातील ग्रामपंचायतींना वित्त आयोग आणि हीरक महोत्सवी वर्षानिमित्त देण्यात आलेला निधी अनेक पंचायतींमध्ये तसाच पडून आहे. काही पंचायतींनी नियोजित प्रकल्प सादर केलेले नाहीत. यापुढे पंचायत मंडळांनी गावाच्या उत्कर्षासाठी विकास केंद्रस्थानी ठेवून काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केले. ताळगाव येथे उत्तर गोव्यातील नवनिर्वाचित पंचायत सदस्यांसाठी आयोजित खास प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले. राज्यातील पंचायत मंडळांनी कचरा व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे. तसेच कामकाज व कर्तव्ये व्यवस्थित पार पाडावीत. सरकारकडून पंचायतींना सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल, असे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.