31 C
Panjim
Saturday, March 6, 2021

न्यूझीलंडची ऑस्ट्रेलियावर मात

>> टी-२० मालिका; कॉन्वेचे शतक हुकले

डेवॉन कॉन्वेचे एका धावेने हुकलेले शतक आणि ईश सोधीच्या जादुई फिरकीच्या जोरावर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा पहिला टी-२० सामन्यात ५३ धावांनी पराभव करीत घरच्या मैदानावर सुरू असलेल्या पाच लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण मिळाल्यानंतर न्यूझीलंडने डेवॉन कॉन्वेच्या ९९ धावांच्या खेळीच्या जोरावर ५ गडी गमावत १८४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. कॉन्वेने आपल्या ९९ धावांच्या अर्धशतकी खेळीत ५९ चेंडूंचा सामना करताना १० चौकार व ३ षटकार खेचले. ग्लेन फिलिप्सने ३०, जेम्स नीशमने २६ तर कर्णधार केन विल्यम्सने १२ धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाकडून डॅनियल सॅम्स व झाय रिचटर्डसन यांनी प्रत्येकी २ तर मार्कुस स्टॉईनिस यांने १ गडी बाद केला.

प्रत्युत्तरात खेळताना न्यूझीलंडच्या सूत्रबद्ध मार्‍यामुळे ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १३१ धावांवर गारद झाला. त्यांच्या मिचेल मार्शने सर्वाधिक ४४ धावा तर ऍश्टन ऍगरने २३, ऍडम झम्पाने १३, मॅथ्यू वेडने १२ तर झाय रिचर्डसनला ११ धावा धावा जोडता आल्या. इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले. त्यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. न्यूझीलंडकडून ईश सोधीने २८ धावांत महत्त्वाच्या चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. टिम साऊथी व ट्रेंट बौल्ट यांनी प्रत्येकी २ तर कायल जेमिसन आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

आमोण्याची ज्ञानगंगा ः रामदास विद्यालय

डॉ. विठ्ठल ठाकूर त्या काळात पोर्तुगीज सरकारचे सर्व नियम सांभाळले जात असत. वर्षात सर्व परीक्षा योग्य ते परीक्षक...

शाळांमध्ये शारीरिक शिक्षण अनिवार्य

चेतन कवळेकर(राज्यपुरस्कारप्राप्त शारीरिक शिक्षण शिक्षक) शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे फक्त तंदुरुस्त शरीर एवढेच नव्हे, तर त्यात शारीरिक आणि भावनिक...

एक अगम्य चाहता… कधीच न भेटलेला!

ज. अ. रेडकर. मी माझ्या या अगम्य चाहत्याला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही. परंतु आपल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आलेली व्यक्ती...

गूढ वाढले

जगातील आठव्या क्रमांकावरील आणि आशियातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘अँटिलिया’ ह्या सत्तावीस मजली आलिशान निवासस्थानापासून पाच - सहाशे मीटरवर...

सहा पालिकांसाठी ३२३ अर्ज वैध

>> पणजी मनपासाठी १०६ उमेदवार रिंगणात, आज स्पष्ट होणार अंतिम चित्र येत्या २० मार्च २०२१ रोजी राज्यात होणार्‍या पणजी...

ALSO IN THIS SECTION

सहा पालिकांसाठी ३२३ अर्ज वैध

>> पणजी मनपासाठी १०६ उमेदवार रिंगणात, आज स्पष्ट होणार अंतिम चित्र येत्या २० मार्च २०२१ रोजी राज्यात होणार्‍या पणजी...

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतरच निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा

>> गिरीश चोडणकर यांचे आयोगाला पत्र गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राज्य निवडणूक आयोगाला लिहिलेल्या एका...

शुक्रवारी राज्यात ७९ कोरोना रुग्ण

राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी १ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून नवीन ७९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना...

सीझेडएमपीवर उद्या सुनावणी

राज्यात येत्या रविवार ७ मार्चला पणजी आणि मडगाव येथे किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावर (सीझेडएमपी) जनसुनावणी घेतली जाणार आहे. पणजी येथील जनसुनावणी कला...

महामंडळांनी स्वयंपूर्ण व्हावे ः मुख्यमंत्री

>> महामंडळांच्या आर्थिक स्थितीचा बैठकीत आढावा राज्य सरकारच्या महामंडळांना कर्ज कमी करून त्यांना स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी नवीन उपक्रम...