केंद्र सरकारने बेकायदा खाणींच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. शहा आयोग स्थापन केला आहे. काल न्या. शहा यांनी भेट देण्यावेळी आयोगाचे सदस्य यू. व्ही. सिंग, मुख्य वनपाल डॉ. शशी कुमार, वाहतूक खात्याचे अरुण देसाई, पोलीस अधीक्षक अरविंद गावस, जिल्हाधिकारी मिहिर वर्धन, उपजिल्हाधिकारी नारायण गाड, बोसेट सिल्वा, मामलेदार प्रमोद भट, गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळाचे पदाधिकारी, इंडियन ब्युरो ऑफ माईन्सचे अधिकारी उपस्थित होते.
काल सकाळी ११ च्या सुमारास सुमारे २५ गाड्यांचा ताफा धबधबा येथील खाणीवर दाखल झाला. यावेळी न. शहा, यू. व्ही. सिंग व अन्य अधिकार्यांनी चर्चा करून कागदपत्रे तपासली व खाणीची माहिती करून घेतली. या परिसरातील अन्य खाणींचीही त्यांनी पाहणी केली. नंतर त्यांनी मुळगाव येथे जाऊन गावकर्यांशी संवाद साधला.
दरम्यान, आज दि. १७ रोजी न्या. शहा सरकारी अधिकार्यांशी चर्चा करणार आहेत. त्याआधी सकाळी ते राज्यातील नागरिकांचे म्हणणे एकतील.