चौगुले महाविद्यालयाने यावर्षी उच्च माध्यमिक विद्यालय बंद न करण्याचे ठरविल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने चौगुले महाविद्यालयाचा अर्ज निकालात काढला.
पुढील वर्षापासून उच्च माध्यमिक विद्यालय बंद करण्यासाठी चौगुलेने पुढील दोन आठवड्याच्या आत शिक्षण खात्याकडे नव्याने अर्ज करण्यास न्यायालयाने सांगितले.