27.6 C
Panjim
Wednesday, May 19, 2021

नौदल परिसरात फेसबुक स्मार्ट फोन वापरावर बंदी

नौदलाचे सात कर्मचारी पाकिस्तानी गुप्तचरांना नौदलाविषयी संवेदनशील माहिती पुरवित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता नौदलाने आपल्या कर्मचार्‍यांवर नौदल परिसरात फेसबुक वापरण्यास बंदी घातली आहे. नौदल तळांवर, डॉक यार्ड व युद्धनौकांवर स्मार्ट फोन वापरण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकलेल्या सात नौदल कर्मचार्‍यांना भारतीय नौदलातील संवेदनशील माहिती सोशल मिडियावरून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना देताना पकडण्यात आले होते. त्यानंतर भारतीय नौदलाने हे कडक पाऊल उचलले आहे. यासंदर्भात नौदलाने एक अंतर्गत आदेश जारी केला असून त्यानुसार मॅसेजिंग ऍप्स, नेटवर्किंग व ब्लॉगिंग, कंटेट शेअरींग, ई-कॉमर्स साईट्‌स होस्टिंग यावर नौदल कर्मचार्‍यांना बंदी घालण्यात आली आहे.

सुमारे दहा दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश पोलिसांनी याविषयाच्या रॅकेटचा पर्दाफाश करून सात नौदल कर्मचार्‍यांना विशाखापट्टणम, कारवार व मुंबई येथील नौदल तळांवरून अटक केली होती. दरम्यान, याआधीही नौदल कर्मचार्‍यांवर अशा प्रकारचे सोशल मिडिया वापरावर निर्बंध घालण्यात आले होते असे नौदलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
पाकिस्तानी गुप्तचरांकडून चालविल्या जाणार्‍या सोशल मिडिया ऍपवरून सात भारतीय नौदल कर्मचारी पाकिस्तानला माहिती पुरवित असल्याचे आंध्रप्रदेश पोलिसांना आढळून आले होते.

STAY CONNECTED

848FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

इकडेही लक्ष द्या

कोरोनाचा वणवा राज्यात चहुदिशांनी भडकल्यावर आणि सर्वतोपरी सज्जतेचे दावे उच्च न्यायालयात उघडे पडल्यावर आता राज्य सरकार उपाययोजनांच्या विहिरी खोदायला निघाले आहे. गोवा...

कोरोना बळींची संख्या २ हजारांजवळ

>> राज्यात शुक्रवारी ६१ मृत्यू, २४५५ बाधित, एकूण बळी १९९८ राज्यात गेल्या चोवीस तासांत पुन्हा एकदा उच्चांकी ६१ रुग्णांचा...

प्राणवायूसंदर्भातील उपाययोजनांचा अहवाल उच्च न्यायालयात सादर

राज्य सरकारचे आरोग्य सचिव रवी धवन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला गोमेकॉमधील प्राणवायू पुरवठा व इतर समस्या सोडविण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा...

गोमेकॉत प्राणवायू टाकी बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ः मुख्यमंत्री

बांबोळी येथील गोमेकॉतील वैद्यकीय प्राणवायू पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन २० हजार लीटर क्षमतेची प्राणवायू टाकी बसविण्याचे काम जोरात सुरू आहे, अशी माहिती...

कोरोनाविरोधातील युद्ध जिंकणारच ः मोदी

>>किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकर्‍यांना आठवा हप्ता भारताचे अद्यापही कोरोनाशी सुरू असलेले युद्ध आपण लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्‍वास पंतप्रधान...

ALSO IN THIS SECTION

येत्या १५ दिवसांत राज्यांना १.९२ कोटी डोस ः जावडेकर

येत्या पंधरा दिवसांत केंद्र सरकारकडून राज्यांना १.९२ कोटी लशींचे डोस देण्यात येतील अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल दिली. देशातील...