Home बातम्या नोकरीत घ्या नाहीतर उपोषण

नोकरीत घ्या नाहीतर उपोषण

0

काल संध्याकाळी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, कॉंग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, जेनिफर मोन्सेर्रात तसेच अपक्ष आमदार विजय सरदेसाई, नरेश सावळ, माजी युवा कॉंग्रेस अध्यक्ष संकल्प आमोणकर व प्रतिमा कुतिन्हो या नेत्यांनी धरणे स्थळी हजर राहून वरील उमेदवारांना पाठिंबा व्यक्त केला.

याप्रसंगी बोलताना प्रतापसिंह राणे म्हणाले की, वरील उमेदवारांना नव्या सरकारने सेवेत सामावून घ्यावे. सरकारे येतात आणि जातात, असे सांगून भाजप सरकार पडल्यानंतर २००५ साली कॉंग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही पर्रीकर यांनी सत्तेवर असताना नेमलेल्या रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थींना सेवेत कायम केले होते, याची त्यांनी आठवण करून दिली.

याप्रसंगी बोलताना दिगंबर कामत म्हणाले की, भरती प्रक्रिया एका रात्रीत पूर्ण करता येत नाही. गेल्या २४ डिसेंबर रोजी राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली होती पण त्यापूर्वी बर्‍याच खात्यातील भरतीसाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. मात्र, आचारसंहिता लागू झाल्याने काहीजणांना नियुक्तीपत्रे देण्याची राहून गेली होती, असे सांगून या उमेदवारांवर सरकारने अन्याय करू नये, अशी मागणी त्यांनी केली.

आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, विजय सरदेसाई, नरेश सावळ, प्रतिमा कुतिन्हो, महेश नाईक, अजितसिंह राणे, सुदीप ताम्हणकर आदींची यावेळी भाषणे झाली.

तद्पूर्वी काल सकाळी ९.३० वाजल्यापासून संध्याकाळी ६ पर्यंत सुमारे १५० उमेदवारांनी आपणाला सेवेत सामावून घेतले जावे या मागणीसाठी धरणे धरले.