इतर ५३ जणांनाही सजा सुनावण्यात आली आहे. न्यायालयात हा निवाडा सुनावला जात असताना बाहेर चौटाला स’र्थकांनी जोरदार दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला व अश्रुधुराची नळकांडी फोडावी लागली.
न्या. विनोद कुमार यांनी गेल्या आठवड्यात चौटाला व अन्य ५३ जणांना शिक्षक भरती गैरव्यवहारप्रकरणी दोषी धरले होते. दोषींमध्ये दोघा आयएएस अधिकार्यांचाही समावेश आहे. त्या सर्वांना वेगवेगळ्या सजा सुनावण्यात आल्या आहेत. पाच वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री राहिलेले चौटाला व त्यांचे पुत्र अजय चौटाला हे भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे विद्यमान आमदार आहेत.
शिक्षा सुनावली जात असताना ओमप्रकाश चौटाला हे प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून न्यायालयात हजर नव्हते. चौटाला पिता पुत्रांबरोबरच संजीव कुमार या तत्कालीन प्राथमिक शिक्षण सचिवांस, विद्या धर या विशेष अधिकार्यास व मुख्यमंत्र्यांचे तत्कालीन राजकीय सल्लागार शेरसिंग बदशामी यांनाही सजा सुनावण्यात आली आहे.सर्व ५५ दोषींना भारतीय दंड संहितेचे कलम १२० ब, ४१८, ४६७, ४७१ खाली सजा झाली असून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम १३(१)(ड) व १३ (२) खालीही सजा सुनावण्यात आली आहे. सन २००० मध्ये ३२०६ कनिष्ठ शिक्षकांच्या भरतीमध्ये चौटाला पितापुत्रांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

