नोंदणी न केलेल्या आणखी २७ बेकायदा हॉटेल्सना नोटिसा

0
6

>> पर्यटन खात्याची कारवाई

पर्यटन खात्याकडे नोंदणी न केलेल्या आणखी २७ हॉटेल्सना काल नोटीस पाठविण्यात आली आहे.

पर्यटन खात्याने पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या हॉटेल्स व इतर व्यावसायिकांना कायद्यानुसार पर्यटन खात्याकडे नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. तथापि, काही हॉटेल व इतर व्यावसायिकांनी नोंदणी केलेली नाही. पर्यटन खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी पर्यटन खात्याकडे नोंदणी न केलेल्या आस्थापनांविरोधात कारवाईचा इशारा दिला होता.

पर्यटन खात्याने नोंदणी न केलेल्या आस्थापनांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेअंतर्गत उत्तर गोव्यातील ११ हॉटेल्सना प्रथम नोटीस पाठविण्यात आली आहे. आता, दक्षिण गोव्यातील आणखी २७ हॉटेलना नोटीस पाठविली आहे. हॉटेल आस्थापनांवर बेकायदा व्यवसाय करीत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्या हॉटेल्सना नोंदणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. नोटीस पाठविण्यात आलेल्या हॉटेल्सनी नोंदणी न केल्यास त्यांना एक लाख रुपये दंड ठोठावला जाऊ शकतोे. दंडाच्या रक्कमेचा भरणा न केल्यास वीज व पाणी कनेक्शन तोंडून हॉटेल सीलबंद केले जाऊ शकते, अशी माहिती पर्यटन खात्याच्या सूत्रांनी दिली.