26 C
Panjim
Tuesday, September 21, 2021

नैराश्याची परिणती ः आत्मघात

  •  डॉ. व्यंकटेश हेगडे

आत्महत्येचे प्रमाण हल्ली खूपच वाढलंय. आपली बदललेली जीवनशैली हे मुख्य कारण. त्या जीवनशैलीमध्ये भोग आहे. मानवी मूल्यांचा र्‍हास आहे. चांगल्या संस्कारांचा अभाव आहे. वखवखलेल्या वासनेचा सुकाळ आहे. अप्रामाणिकपणाने कळस गाठलाय.

प्रसारमाध्यमे अनेकवेळा आत्महत्येच्या बातम्या ठळक व भडक करून अगदी पहिल्या पानावर देतात. हे वाचून अनेकांच्या मनातल्या आत्महत्येच्या विचाराला बळ मिळते.

माणसाला निसर्गाने शरीर आणि मन दिले. त्या शरीराची आणि मनाची योग्य काळजी घेत आपले जीवनमान निरोगी, आनंदी ठेवत अनेक वर्षे जगणे हा खरा पुरुषार्थ आहे.

विवेकाद्वारे मनात आलेल्या वाईट विचारांना झिडकारत चांगला विचारच कृतीत आणायला शिकविणारे ते ज्ञान. हे ज्ञान, हा विवेक जेव्हा असतो तेव्हाच त्याला मानव म्हणायचे.

एक दिव्य भव्य घटना घडलीय. आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला. या जन्मात अनेक मौैल्यवान वस्तू, गोष्टी मिळाल्या. आपली नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा ही पंचेंद्रिये. अनेक सुखे या पंचेंद्रियांतून मिळाली- नाकातून सुगंध, कानातून चांगले संगीत, जिभेतून कुणाची स्तुती, काहीतरी रुचकर, खमंग खायचे आणि कातडीतून स्पर्श ही सुखे घ्यावीतच. मग माणसाला मुख्यत्वे बुद्धी मिळाली. ही बुद्धी चांगल्या पद्धतीने वापरायची. पंचेंद्रियांतून चांगली सुखेच घ्यायची. बुद्धी आहे तिथे विचार आले. मुख्य गोष्ट म्हणजे माणसाला निसर्गाने शरीर आणि मन दिले. त्या शरीराची आणि मनाची योग्य काळजी घेत आपले जीवनमान निरोगी, आनंदी ठेवत अनेक वर्षे जगणे हा खरा पुरुषार्थ आहे. जीवनाचे ध्येय आहे. विश्‍व आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर म्हणतात की, माणसाच्या मनात अनेक विचार येतात. विचारांवर नियंत्रण नाही, पण योग्य विचारच कृतीत आणावा. आत्महत्या घडते तेव्हा मनातील एक खूप वाईट विचार आपण कृतीत आणतो. खरं तर आत्महत्या करून हे सुंदर जीवन संपविण्याचा आपणास अधिकार नाहीच. मानवी जीवन मिळाले ते सुंदर आहे. बहुमूल्य आहे. हो, कधी कधी संकटे येतात तरी आपली बुद्धी, कर्तव्य, जिद्द, कार्यक्षमता व शक्ती वापरून त्या संकटांवर मात करावी. आम्ही मानव आहोत, तेव्हा मैत्री, करुणा व सेवा ही मानवी मूल्ये आहेत. ती अंगी असावी आणि मुख्यत्वे मिळालेला मानव जन्म इतका मौल्यवान आहे तेव्हा स्वत:ला त्रास होईल अशी कुठलीही कृत्ये करू नयेत. आपण त्यावेळी करुणा विसरता. आत्महत्या केली तर आध्यात्मिक ज्ञानानुसार आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे झाले. आध्यात्मिक ज्ञान असणे खूप महत्त्वाचे आहे. जीवनात संकटांचे आव्हान पेलण्याचे ते ज्ञान असते.

आपले अस्तित्व म्हणजे सुख, शांती व प्रेम त्यांचा साक्षात्कार होण्याचे ते ज्ञान. अंतरातल्या आनंदाच्या खळखळ अविरत वाहणार्‍या झर्‍याच्या सान्निध्यात सतत राहणारे हे ज्ञान, खरे वैराग्य. आतल्या आनंदस्वरूपी चैतन्यात एकरूप असणे.
मुख्यत्वे विवेकाद्वारे मनात आलेल्या वाईट विचारांना झिडकारत चांगला विचारच कृतीत आणायला शिकविणारे ते ज्ञान. हे ज्ञान, हा विवेक जेव्हा असतो तेव्हाच त्याला मानव म्हणायचे. आत्महत्या होते तेव्हा तो स्वत:चे जीवन संपवतो. तेव्हा त्याने गैर विचारावर कृती केलेली असते, ते कृत्य भ्याड आहे. हे कृत्य मानव मूल्यात न बसणारे. करुणा हे एक मानवी मूल्य. स्वत:ची करुणा आधी करायची. स्वत:वर अत्यंत प्रेम असायला हवे. स्वत:शीच गाढ मैत्री असायला हवी. स्वत:ला कधीच दूषणे द्यायची नाहीत. स्वत:च्या नजरेत स्वत:ला उच्च स्थानी पाहायचे. आता तर वैद्यकीय नजरेतून पाहिले तर आत्महत्या होते ती नैराश्यातून. आपले मन नैराश्याच्या गर्तेत लोटले जाते. मनातील उत्साह संपतो. काहीही काम करावेसे वाटत नाही. अपराधीपणाची भावना येते. आपण संपलो अशी भावना येते. खूप राग येतो, चिडचिडेपणा येतो. पटकन रडायला येते आणि याच मनात आत्महत्येचे विचार येतात. पश्‍चात्ताप, पाप-पुण्याची भीती, एखाद्या व्याधीबद्दल भीती किंवा एखाद्या संकटाची भीती यामुळे मन छिन्नविछिन्न होते. नैराश्य येते.

आज आपण पाहतो तेव्हा मानसिक ताणतणाव वाढला की नैराश्य येते. मनाच्या क्षमतेपेक्षा जास्त ताणतणाव मनावर घातला की नैराश्य येते. मुख्यत्वे हळव्या मनाच्या तसेच बुद्धिमान माणसाला नैराश्य जास्त येते. आज जगात कोट्यवधी लोक नैराश्याने ग्रासलेले आहेत आणि आत्महत्या करणार्‍यांचाही आकडा खूप मोठा आहे.
आज आम्ही डॉक्टर प्रत्येक पेशंट आला की आधी त्याचे मन बघतो. नैराश्यामुळे कधी निद्रानाश होतो. उगाच डोकेदुखी, अंगदुखी, आळस, उच्च-रक्तदाब, ह्रदयविकार, मधुमेह आदी गोष्टी रुग्णांमध्ये आढळतात.

आत्महत्येचे प्रमाण हल्ली खूपच वाढलंय. आपली बदललेली जीवनशैली हे मुख्य कारण. त्या जीवनशैलीमध्ये भोग आहे. मानवी मूल्यांचा र्‍हास आहे. चांगल्या संस्कारांचा अभाव आहे. वखवखलेल्या वासनेचा सुकाळ आहे. अप्रामाणिकपणाने कळस गाठलाय. म्हणूनच बर्‍याच वेळा विवाहबाह्य संबंधातून आत्महत्या घडताहेत. मुलांनो, अपयश म्हणजे मनाचे सामर्थ्य वाढविण्याचे कारण आणि संकट हे स्वत:मधील शक्ती, बुद्धी, सामर्थ्य, कर्तबगारी एकवटून पेलण्याचे आव्हान! सर्वस्व देऊन मोठे होण्याचे साधन हे शिकवले गेले नाही. पालकांचे किंवा शिक्षकांचे संस्कार कमी पडले म्हणून परीक्षेच्या किंवा प्रेमप्रकरणाच्या अपयशाने आत्महत्या होतात. रामाला रावणाने संकटातून मोठं केलं. जीवनात एखादी व्याधी जडली तर हिमांशु रॉयसारखी वंदनीय, ज्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा, अशी व्यक्ती स्वत:च्या छातीत गोळी मारून घेते.

आज गरज आहे आत्महत्येविरुद्ध जनजागृतीची. मुख्यत्वे प्रसार माध्यमांनी, सामाजिक संस्था, विविध एन. जी. ओ. यांनी जनजागृती करून समाजात, ज्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात त्यांच्या व्यथा ऐकाव्यात. एक हेल्पलाईन आणि समुपदेशन केंद्र प. पू. श्री श्री रविशंकर यांचे आहे. तसेच योगा, ध्यान व सुदर्शन क्रियेतून एक मोठे परिवर्तन मनात होते. ती व्यवस्थाही आर्ट ऑफ लिव्हिंगची आहे. त्याला सर्व सामाजिक संस्थांनी व एनजीओंनी मदत करावी. एखादा नैराश्यात बुडालेला पेशंट कुणालाही आढळला तर त्याला त्वरित मानसोपचारतज्ञाकडे न्यावा व योग्य उपचार त्याच्यावर करावेत. आज समाजात सर्वांनीच चौफेर व चोखंदळ नजर ठेवीत नैराश्याने ग्रासलेले पेशंट शोधावेत. आईवडिलांची व शिक्षकांची घारीची नजर आपल्या पाल्यावर, विद्यार्थ्यांवर असावी. नैराश्यावर मानसोपचार तज्ञ डॉक्टरांचा इलाज तसेच समुपदेशन, योग, सुदर्शन क्रिया, ध्यान हे रोज केल्याने नैराश्याचे समूळ उच्चाटन होईल.

प्रसारमाध्यमे अनेकवेळा आत्महत्येच्या बातम्या ठळक व भडक करून अगदी पहिल्या पानावर देतात. हे वाचून अनेकांच्या मनातल्या आत्महत्येच्या विचाराला बळ मिळते. हिमांशु रॉयने कॅन्सरला कंटाळून स्वत:वर बंदूक झाडून केलेल्या आत्महत्येनंतर काही दिवसांनी अमृत मलमचे मालक व एका सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरुने स्वतःवर पिस्तुलाची गोळी मारूनच आत्महत्या केली. खरं तर अशा अनेक घटना हिमांशु रॉयमुळे घडल्या असतील.

आमचे गुरुदेव सांगतात, अरे, आपला जीव वाचवा, मला तुमची गरज आहे. तुमच्या गरजा मी भागवीन. मी तुमचे जीवन सुखी व शांत कसे करावे हे शिकवीन. नैराश्यासाठी मी उपाय करीन. आत्महत्या कराल तर जीवन कळलं नाही. उमगलं नाही. कृपया स्वत:ला सांभाळा.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

‘आयपीएल’चा तडका आजपासून आखातात

सुधाकर रामचंद्र नाईक ‘कोविड-१९’च्या मृत्युतांडवामुळे आकस्मिकपणे अनिश्‍चित कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आलेल्या बहुचर्चित तथा देश-विदेशांत अङ्गाट लोकप्रियता लाभलेल्या ‘इंडियन...

ताण, तणाव आणि आपण

गिरिजा मुरगोडी तुम्ही करत असलेल्या कामावर जर तुमचं प्रेम असेल आणि तुम्हाला माणसांची आवड असेल तर कुठलीच गोष्ट...

मुंगी ः एक किमयागार

अंजली आमोणकर नियमबद्धता, विचारी भाव, बदलत्या परिस्थितीशी सामना करण्याची तयारी असावी हे मुंगी शिकवते. मुंगीचं जीवन मानवासाठी मोठा...

विमा उद्योगाचे खाजगीकरण

शशांक मो. गुळगुळे अलीकडे केंद्र सरकारकडून खाजगीकरणाबाबत बर्‍याच क्रांतिकारक घोषणा करण्यात आल्या. विरोधी पक्ष त्यांचे काम म्हणून याला...

कॅप्टन पदच्युत

राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्याची सध्या जी मालिका चालली आहे, त्यामध्ये भाजपने उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पायउतार केले, तर कॉंग्रेसने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन...

ALSO IN THIS SECTION

सॅनिटायझेशन – मास्क – सोशल डिस्टंसिंग (एस्‌एम्‌एस्)

डॉ. मनाली पवार हे जे कोरोना योद्धा दिवसरात्र कार्यरत आहेत, ते तुमच्या सर्वांच्या हितासाठीच. त्यामुळे घरात- बाहेर कुठेच...

भारतीय संस्कृतीची महती

योगसाधना - ५१६अंतरंग योग - १०१ डॉ. सीताकांत घाणेकर भारतीय संस्कृतीतील अशा गोष्टी अत्यंत विलोभनीय...

‘पंचप्राण’ आणि त्यांचे कार्य योगसाधना – ५१४ अंतरंग योग – ९९

डॉ. सीताकांत घाणेकर आपल्या जीवनातून निरुपयोगी गोष्टी फेकून देता आल्या पाहिजेत. हलक्या प्रकारचे रागद्वेष, खोटे अहंकार, अविवेकी क्रोध...

बायोस्कोप कॅलिडोस्कोप

प्रा. रमेश सप्रे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा कॅलिडोस्कोप कालचक्र नि घटनाचक्र यानुसार बदलतच असतो. मुख्य भूमिका पाहणार्‍याची म्हणजे प्रत्येकाची...

‘गाऊट’वर प्रभावी होमिओपॅथी (वातरक्त किंवा संधी रोग)

डॉ. आरती दिनकर(होमिओपॅथी तज्ज्ञ आणि समुपदेशक) ‘गाऊट’मधील रोगाचे मुख्य कारण म्हणजे रुग्णाच्या रक्तात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढलेले असते....