नैऋत्य मान्सूनने गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिसाच्या काही भागांतून माघार घेतली आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने काल दिली. मान्सूनच्या माघारीची रेषा सध्या पणजी, बेळगाव, हैदराबाद आणि इतर ठिकाणांवरून जात आहे. पुढील तीन ते चार दिवसांत पूर्व भारत, द्वीपकल्पाचा उत्तर भाग आणि ईशान्य भारतातील अनेक भागांतून मान्सूनच्या पुढील माघारीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

