दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
९४ वर्षीय नोबेल पुरस्कार विजेते नेल्सन मंडेला यांना फुफ्फुसाच्या त्रासामुळे काही महिन्यांपूर्वी प्रिटोरिया येथील इस्पितळात दाखल करण्यात आले होते.