नेपाळच्या जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यांमध्ये सध्या सुमारे 898 कर्मचारी अडकलेले आहेत, तर आतापर्यंत 361 जणांची सुटका करण्यात आली आहे. बोगद्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य अधिक तीव्र करण्यात आले आहे.
त्रिशुली-3 ‘ए’ जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात सुरू असलेल्या बचावकार्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे. बचाव पथके माती आणि गाळ हटवण्यासाठी यंत्रसामग्रीचा वापर करत आहेत. बोगद्यात पाडलेल्या सहा इंचांच्या छिद्रातून एका पाईपद्वारे हवा आत सोडली जात असून हे हे छिद्र मोठे करून त्याचे ‘मॅनहोल’मध्ये रूपांतर करण्याची तयारी सुरू आहे, जेणेकरून बचाव पथके बोगद्यात प्रवेश करू शकतील आणि अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेऊ शकतील.
दि. 26 ऑगस्ट रोजी नेपाळमधील भोटे कोशी आणि त्रिशुली नद्यांना अचानक पूर (फ्लॅश फ्लड्स) आला होता. या आपत्तीमुळे नेपाळमध्ये आतापर्यंत 788 जणांचा मृत्यू झाला आहे, तर तिबेटमधील मृतांची संख्या 16 वर पोहोचली आहे.
मदतीसाठी अनेक देश
नेपाळवर कोसळलेल्या या नैसर्गिक संकटासाठी अनेक देशांनी नेपाळसाठी आर्थिक आणि मानवतावादी मदतीची घोषणा केली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातून मदत साहित्य घेऊन येणारे तिसरे विमान शुक्रवारी काठमांडू येथे दाखल झाले. यामध्ये 10 टन मानवतावादी मदत साहित्यासह, 11 सदस्यीय वैद्यकीय आणि बोगदा बचाव पथकाचा समावेश होता.
ब्रिटन, युरोपियन युनियन, कॅनडा, अमेरिका, चीन या देशांनीदेखील आपत्कालीन मदत साहित्य आणि आर्थिक मदत पुरवण्याची व्यवस्था केली आहे.
बेपत्ता 149 भारतीयांची नावे जाहीर
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने काल रविवारी 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या बचाव कार्याबाबत अद्ययावत माहिती दिली आहे. नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे.
पुन्हा पुराच्या संकटाची भीती
नेपाळमध्ये पुन्हा पूर येण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. भोटेकोशी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

