गुजरात उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती जी. डी. कामत (८०) यांचे काल सकाळी बेळगाव येथील केएलई इस्पितळात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दास कामत म्हणून ते परिचित होते. काल संध्याकाळी सांतइनेज स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कायदा क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्याचे ऍडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी न्या. कामत यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

