गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन कर्मचार्यांची भरती करण्यासाठी मुलाखती घेणे, नोकरीचे प्रस्ताव देणे व नियुक्तीची पत्रे देणे हे सर्व सोपस्कार दि. २३ डिसेंबर या एकाच दिवसात पूर्ण केल्याची एक तक्रार निवडणूक आयोगाकडे आल्याने संयुक्त मुख्य निवडणूक अधिकार्यांनी गोमेकॉच्या डीनना नोटीस पाठवून ४८ तासांच्या आता संपूर्ण माहिती सादर करण्यास सांगितले आहे.
वरील तिन्ही सोपस्कार एकाच दिवशी पूर्ण कसे झाले हा निवडणूक अधिकार्यांसमोर प्रश्न आहे. बहुतेक खात्यांनी नोकर भरतीची प्रक्रिया दि. २३ रोजीच पूर्ण केल्याचा अहवाल आयोगाला पाठविला असून अहवालाचे संकलन करण्याचे काम चालू असल्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी सांगितले.