दुसर्या आरोपीला बिहारमधून अटक
पाच वर्षीय बालिकेवरील निर्घृण लैंगिक अत्याचार प्रकरणी भडकलेल्या दिल्लीकरांनी कालही जोरदार निदर्शने केली. निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रो रेल्वेची तीन स्थानके सुरक्षेच्या कारणास्तव काल बंद ठेवण्यात आली. दरम्यान, याप्रकरणातील पहिला अटक केलेला आरोपी मनोज कुमार याने नाव सांगितलेल्या प्रदीप यालाही परवा उशीरा रात्री बिहार येथून ताब्यात घेण्यात आले.
सध्या ही बालिका एआयआयएमएस येथे वैद्यकीय उपचार घेत आहे. पूर्व दिल्लीच्या गांधीनगर भागातील या घटनेत बालिकेला पळवून शेजार्याने अमानुषपणे लैंगिक अत्याचार केले होते. शिवाय तिला उपाशी डांबूनही ठेवण्यात आले होते. निदर्शकांनी दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर निदर्शने करताना पोलीस आयुक्त नीरज कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. बालिकेप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी एआयआयएमएस समोरही लोकांनी गर्दी केली होती.

