काल दुपारी नावेली येथील चाररस्त्याच्या संगमावर ट्रक व दुचाकी अपघातात शहाद इस्माईल मोहिद्दिन(१९) हा रामवाडो येथील तरुण ठार झाला.
दुपारी जीए ०९ यु ६०९० क्रमाकांचा ट्रक कुंकळ्ळी मार्गे मडगावच्या दिशेने येत होता. त्याचवेळी समोरून जीए-०८-एच-६३०७ क्रमांकाच्या मोटर सायकलची ट्रकला धडक बसली व त्यात मोटरसायकल चालक ट्रक खाली सापडला व जागच्या जागी ठार झाला.